Thursday, 28 June 2018

रांजणगाव देशमुख येथे खा लोखंडे यांचा सर्वपक्षीय सत्कार ; 'निळवंडे' ला केंद्रिय जलआयोगाची मान्यता


राजणगाव देशमुख ( वार्ताहर):-

खा लोखंडें यांनी निळवंडेसाठी कृती समितीच्या मदतीने केद्रातुन २२३२ कोटी खर्चाला मान्यता आणल्यामुळे त्यांचा रांजणगाव देशमुख ग्रामस्थांच्या वतीने भव्य सर्वपक्षीय नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुंजा खालकर हे होते.

केंद्रिय जलआयोगाची मान्यता मिळाल्यामुळे रविवारी खा लोखंडे व निळवंडे पाटपाणी कृती समितीचा कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे भव्य सर्वपक्षीय सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना खा लोखंडे म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीच्या वेळी मला लोकांनी गावात येण्यास अडवले. परंतू आता तुम्ही स्वतःहुन मला सत्कारासाठी आमंत्रीत केले. निळवंडेचा प्रश्न आता पुर्णपणे सुटला असुन कालव्यांची कामे सुरु झाली आहेत. आपल्या शेतात दिड वर्षाच्या आत पाणी येणार आहे. साईबाबांचा नावाने व जलआयोगाच्या अधिका-यांच्या मदतीने आपला प्रश्न मिटला आहे. यावेळी निळवंडे पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, गंगाधर गमे, सुकलाल गांगवे आदींचे भाषने झाली. यावेळी खा लोखंडेंसह समितीच्या पदाधीका-यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी पंचायत समिती सदस्य सौ. इल्हे मॅडम, सरपंच संदीप रणधीर माजी पोलीस पाटील निवृत्ती गोर्डे, माजी सरपंच अत्याभाऊ वर्पे, अनिल खालकर, संपत खालकर, सोमनाथ खालकर, गजानन मते, योगेश चव्हाण, सचिन खालकर, रावसाहेब गोर्डे, दत्ता भालेराव, पराग खंडीझोड, श्रीकांत मापारी, अरुण ठोंबरे, धनंजय वर्पे, संजय गोर्डे, ज्ञानदेव चव्हाण, तुषार काथे, शिवाजी वामन, बाळासाहेब घोरपडे, उत्तम घोरपडे, बाळासाहेब धाकतोडे, विक्रम ठोंबरे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोट्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment