Thursday, 14 June 2018

डॉ. कोल्हे यांना 'बेस्ट आर्टीफिशियल टेक्निशियन' पुरस्कार प्रदान; दिल्ली येथे कृषी मंत्री राधामोहन सिंग यांच्या हस्ते वितरण


रांजणगाव देशमुख (प्रतिनिधी):- कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील गोदावरी दूध संघाचे कृत्रिम रेतन तंत्रज्ञ डॉ. बाळासाहेब कोल्हे यांना राष्ट्रीय गोकुळ मिशन भारत सरकार यांच्याकडून देण्यात येणारा 'बेस्ट आर्टीफिशियल टेक्निशियन २०१८' हा पुरस्कार दिल्ली येथे केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी केंद्रीय कृषी राज्यमंत्री तसेच कोपरगाव तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप दहे, दिलीप जामदार, डॉ. अजयनाथ थोरे हे उपस्थित होते. दरम्यान हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा पोहेगाव येथे सत्कार करण्यात आला. यावेळी काळे कारखान्याचे संचालक सुनील शिंदे, राहुल रोहमारे, राजेंद्र जगन्नाथ औताडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत डॉ. कोल्हे यांचे अभिनंदन केले. सादर प्रसंगी नितीन नवले, रावसाहेब औताडे, सोमनाथ वाके, संजय औताडे, विठ्ठल जावळे, गणेश औताडे, गंगाराम औताडे, संजय भालेराव, सुजय जगताप, कैलास जाधव आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment